
सामना ऑनलाईन। श्रीनगर
पुलवामा जिल्हयातील त्राल भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहे.
2 terrorists killed in an encounter with security forces in Pulwama’s Tral. 1 CRPF personnel injured & has been evacuated to 92 Base Hospital. Operation underway. #JammuAndKashmir (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Iz1qrotuNa
— ANI (@ANI) June 19, 2018
रमजानच्या पवित्र महिन्यात केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमध्ये एकतर्फी शस्त्रसंधीची घोषणा केली होती. पण तरीही जम्मू-कश्मीरमध्ये ६६ दहशतवादी हल्ले झाले. यात २२ जवान शहीद झाले असून १९ नागरिक ठार झाले आहेत. यामुळे केंद्र सराकारने सोमवारी ही शस्त्रसंधी मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेचच लष्कराने ऑपरेशन ऑलआऊट ही मोहिम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.

























































