
सामना ऑनलाईन । बीजिंग
चीनच्या आकाशात उडती तबकडी (यूएफओ) दिसल्याचा दावा असंख्य नागरिकांनी केला आहे. चीनमध्ये सध्या सैन्य अभ्यास सुरू असून याच दरम्यान यूएफओची छायाचित्र सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर शेअर होत आहेत.
शनिवार आणि रविवारी बोहाई सागर आणि बोहाई जलडमरूमध्ये चिनी नौसेनेने सराव सुरू केला. चिनी नागरिकांनी आकाशात उडणारी वस्तू पाहिल्याचा दावा केला आहे. चीनमधील सोशल मीडिया साइट वीबोवर लोकांनी यूएफओची छायाचित्र आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. रविवारी पहाटे 4 वाजता ही छायाचित्रे घेण्यात आली.






















































