अशी एक झापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही! बेताल भाजप आमदाराला मुख्यमंत्र्यांचा ‘प्रसाद’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचे श्रद्धास्थान असलेल्या ‘शिवसेना भवन’ची तोडपह्ड करू, अशी बाष्कळ बडबड करणाऱया भाजप आमदार प्रसाद लाड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. ‘आम्हाला कोणी थपडा मारण्याची धमकी देऊ नये. अशी एक झापड देऊ की तुम्ही पुन्हा कधी उठणार नाही’, असा सणसणीत इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

शनिवारी माहीम येथील पक्षीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बेताल बडबड केली होती. माहीममध्ये आम्ही आलो की मोठा पोलीस बंदोबस्त असतो. त्यांना आम्ही शिवसेना भवनात तोडपह्ड करू अशी भीती वाटते. वेळ आल्यास तेसुद्धा करू, असे लाड म्हणाले. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार लाड यांचा यावरून जबरदस्त समाचार घेतला. ते म्हणाले,   पिक्चरमधला एक डायलॉग आहे ‘थप्पड से डर नही लगता…’ या अशा थपडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढय़ा खाल्ल्या त्यापेक्षा दामदुपटीने दिलेल्या आहेत आणि यापुढेसुद्धा देऊ. त्यामुळे आम्हाला कोणी थपडा मारण्याची धमकी देऊ नये. अशी एक झापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही, अशा शब्दांत विरोधकांवर मुख्यमंत्री ठाकरे कडाडताच ‘शिवसेना… झिंदाबाद!’च्या घोषणा निनादल्या. याचाच उल्लेख करीत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हा शिवसेनेचा आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या रक्ताचा गुण आहे.  हा आवाज उठलाच पाहिजे.