‘अंडरवर्ल्ड ते सायबरवर्ल्ड’ या पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘अंडरवर्ल्ड ते सायबरवर्ल्ड’ या गुन्हेगारीवर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रविवारी दुपारी मातोश्री येथे हे प्रकाशन पार पडले. या प्रकाशनाच्या वेळी शिवसेना खासदार व दै. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे.


प्रभाकर पवार यांची यापूर्वी पोलीस डायरी, ‘मुंबईतील रक्त गोठवणारी गुन्हेगारी’, गँगवार ते बॉम्बस्फोट, ‘मुंबईतील गुन्हेगारीचा एन्सायक्लोपिडीया, मुंबई माफिया (हिंदी), ‘मुंबई ज्वालामुखीच्या उंबऱ्यावर, ‘पंचनामा’ अशी सात पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.