
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) ‘यूजीसी नेट’ परीक्षा पुन्हा स्थगित केली आहे. 17 ते 25 ऑक्टोबरदरम्यान ही परीक्षा होणार होती. परंतु त्याच कालावधीत इतरही परीक्षा येत असल्याने परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय ‘एनटीए’ने घेतला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वतीने ‘यूजीसी नेट’ परीक्षा घेण्यात येते. विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्त्या आणि कनिष्ठ संशोधक फेलोशिपसाठी ही परीक्षा घेतली जाते. ‘एनटीए’ने यापूर्वीही दोन वेळा ही परीक्षा पुढे ढकलली होती. यापूर्वी 6 ते 8 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार होती. ती पुढे ढकलून 17 ते 19 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. तीसुद्धा पुन्हा पुढे ढकलली गेली. आता परीक्षेच्या नव्या तारखा ‘यूजीसी’च्या वेबसाईटवर जाहीर केल्या जाणार आहेत.































































