
प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून आलेले शिंदे गटाचे नगरसेवक विक्कीसिंग लबाना यांचे नगरसेवक रद्द झाले आहे. नाशिक येथील जात प्रमाणपत्र पडताळणीत लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. दरम्यान उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नगरसेवकपद रद्दचे आदेश दिले आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 ‘अ’ या राखीव प्रभागातून विक्कीसिंग दर्शनसिंग लबाना हे निवडून आले होते. नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी अर्जदारास दिलेले बंजारा जातीचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. दरम्यान पालिकेत भाजप 37, शिंदे गट 36, वंचित 2, काँग्रेस 1, साईपक्ष 1, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. आता शिंदे गटाचे विक्कीसिंग यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्यांच्या नगरसेवकांची संख्या 35 झाली आहे.
























































