उमा भारती यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uma-bharti

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांची नियुक्ती केली असून केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी याबाबत घोषणा केली.

‘उमा भारती यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना पक्षासाठी काम करायचे आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे’, असे जेपी नड्डा यांनी सांगितले.