
उत्कर्ष सेवा मंडळाच्या ‘उंबरठा’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रविवार, 25 डिसेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात रंगणार आहे. अंतिम फेरीमध्ये सात एकांकिकांमध्ये चुरस रंगणार आहे.
संस्थेच्या वतीने सलग 19 वर्षे ‘उंबरठा’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नोव्हेंबरमध्ये स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली यात 40 संस्था सहभागी झाल्या होत्या. यातून सात एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. यात आखाडा (एकदम कडक नाटय़ संस्था, भाईंदर पूर्व), डोक्यात गेलंय (ज्ञानसाधना नाटय़ परिवार), बारम (महर्षी दयानंद महाविद्यालय), हाऊ कॅन आय हेल्प यू (नाटय़रसमय), प्रवास ( नाटय़स्पर्श आणि भवन्स महाविद्यालय), काहीतरी अडकलंय (गुरू नानक खालसा स्वायत्त महाविद्यालय), उकळी (कीर्ती महाविद्यालय) या एकांकिकांचा समावेश आहे.


























































