
आसाममध्ये अखेर समान नागरी कायदा विधेयक मंजूर करण्यात आला. यामुळे आता आसाममध्ये लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप, घटस्फोट आणि वारस हक्क अशा अनेक गोष्टींच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. समान नागरी कायद्यांतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीने दोन लग्न किंवा त्यापेक्षा जास्त विवाह केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
अल्पसंख्याक समुदायातील महिलांचे संरक्षण व्हावे, त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने हे बिल सादर करण्यात आल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह अनेक मुस्लिम नेत्यांनी या विधेयकावर जोरदार टीका केली असून मुस्लिम धर्मावर हिंदू कायदा लादण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

























































