
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना श्वसनाला त्रास होत असल्याने शनिवारी रात्री 11 वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून रुग्णालयात दाखल होण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे.
यापूर्वी त्यांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने 2 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. 14 ऑगस्टपर्यंत त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले व नंतर घरी आयसोलेशनमध्ये ते होते. परंतु, नंतर पुन्हा 18 ऑगस्टला त्यांना त्रास जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले. ते 31 ऑगस्टपर्यंत एम्समध्ये उपचार घेत होते. त्यानंतर पुन्हा डिस्चार्ज घेतला असता त्याच्या 14 दिवसांनंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने अमित शहा यांना आता पुन्हा एम्समध्ये भरती करावे लागले आहे.




























































