
गेल्या काही दिवसांत कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेक स्वंयपाक घरातून कांदा गायब झाला आहे. कांद्याचे भाव सर्वसामान्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कांद्याचे भाव का वाढले याचे स्पष्टीकरण केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिले आहे.
पासवान यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे. कांद्याचे भाव सर्वसामान्य करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यंदा पाऊस एक महिना जास्त पडला त्यामुळे कांदा पिकवण्यास उशीर झाला. तसेच गेल्या वर्षीही कांद्याचे उत्पादन कमी झाले. कर्नाटक, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक कांद्याचे पीक घेतले जाते. या राज्यात अवकाळी पावसामुळे कांद्याला फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन 26 टक्क्यांनी कमी झाले आहे. असे असले तरी देशात कांद्याच्या साठेबाजी करणार्यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पासवान यांनी सांगिअले. 29 सप्टेंबर रोजी कांद्याची निर्यात बंद केली आहे.
तसेच कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने इजिप्तहून 6 हजार 90 टन तर तुर्क्तीहून 11 हजार टन कांदा मागवला आहे. हा कांदा ग्राहकांना 15 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान उपलब्ध होईल अशी माहिती पासवा यांनी दिली. तसेच जानेवारी महिन्यात तुर्कीहून 4 हजार टन कांदा येणाअर असून आणखीन 5-5 हजार टनचे तीन नवीन टेंडर काढल्याचे त्यांनी नमूद केले.





























































