
सामना प्रतिनिधी । पुणे
शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने रस्त्यावर विटी-दांडू, गोट्या खेळून आणि वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले.
माजी महापौर अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, माजी उपमहापौर सतीश देसाई, काँग्रेस पदाधिकारी बाबा नायडू, अप्पा शेवाळे, ऋषीकेश बालगुडे आदी यामध्ये सहभागी झाले होते. शहरात रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यातच मंडळांकडून खोदलेल्या खड्ड्यांसाठी दंड आकारला जातो, तर दुसरीकडे खड्ड्यांकरिता ठेकेदार आणि केबल कंपन्या जबाबदार असताना पालिकेकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खड्डे बुजवा अन्यथा महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी संयोजन केले.































































