
मुंबई विद्यापीठाने अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार संघाकरिता तात्पुरती मतदार यादी तसेच अपात्र ठरलेल्या अर्जाची यादी प्रसिद्ध केली आहे.
विद्यापीठाच्या https://mu.ac.in या संकेतस्थळावरील Election 2022 या लिंकवर किंवा https://m.eduapp.co.in या संकेतस्थळावर वोटर लिस्ट या सदराखाली मतदार यादी देण्यात आली आहे. तसेच ही यादी प्रसिद्ध झाल्याबद्दलची माहिती संक्षिप्त एसएमएसद्वारे संबंधितांना कळविण्यात आलेली आहे.
सदर तात्पुरती मतदार यादीमध्ये वगळलेल्या किंवा चुकीच्या कोणत्याही नोंदी निदर्शनास आल्यास मतदारांनी 22 मेपर्यंत स्पष्टीकरणासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निदर्शनास आणून द्याव्यात, असे प्रभारी कुलसचिव प्रा. सुनील भिरुड यांनी स्पष्ट केले.
- विद्यापीठाच्या https://mu.ac.in या संकेतस्थळावरील ंlection 2022 या लिंकवर किंवा https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर आपल्या संबंधित प्राधिकरणाच्या login मध्ये जाऊन आपल्या अर्जाची स्थिती पाहता येईल.
- यासंदर्भात तात्पुरत्या मतदार याद्यांमधील काही वगळलेल्या किंवा चुकीच्या नोंदी निदर्शनास आणून द्यावयाच्या असतील तर तेथे उपलब्ध करून दिलेल्या Add Grievance या Tab वर Click करून तेथील रकान्यामध्ये सदर बाब स्पष्टीकरणासह नोंदवावी. सदर स्पष्टीकरणाबाबत असणारे कागदपत्रे दिलेल्या संबंधित जागेवर अपलोड करावीत.
- ऑनलाईन पद्धतीव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने (Whatsapp, Email & Letter hard copy) सदर आक्षेप किंवा सूचना नोंदविल्यास त्याची नोंद घेतली जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
























































