अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सूर आळवत उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
urmila-matondkar

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर आज त्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या आधी त्यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशावेळी काँग्रेस नेते मिलिंद देवरा, काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला, काँग्रेस नेते संजय निरुपम देखील उपस्थित होते. मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानते. माझ्यासाठी हा दिवस खूप मोठा दिवस आहे. माझ्या कुटुंबाची वाटचाल ही गांधीजी आणि नेहरूजींच्या विचारांवर राहिली आहे. काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिले. संविधान दिले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. मात्र आज अशी परिस्थिती आली आहे की अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येत आहे. त्यामुळे त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी मी सक्रीय राजकारणात उतरली आहे, असे उर्मिला यांनी सांगितले.