इराणकडून हिंदुस्थानच्या तेलखरेदीबाबत अमेरिकेचे मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेचे इराणवरील निर्बंध सोमवारपासून लागू झाले आहेत. या निर्बंधामुळे इराणच्या वागणुकीत बदल होईल असा विश्वास ट्रम्प प्रशासनाने व्यक्त केला आहे. चीन आणि हिंदुस्थानकडून आगामी सहा महिन्यात इराणकडून तेलखरेदी थांबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, हिंदुस्थानच्या इराणकडून तेलखरेदीबाबत त्यांनी मौन पाळले. त्यांनी या प्रश्नाला बगल दिल्याने त्याबाबत तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.

अमेरिकेने इराणवर बँकिग आणि पेट्रोलियम क्षेत्रावर निर्बंध लादले आहेत. इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या देशावर कारवाई करण्याचा इशाराही अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेचे हे निर्बंध सोमवारपासून लागू झाले आहेत. सायबर हल्ले, इराणचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र परीक्षण, दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन अशा गोष्टी रोखण्यासाठी इराणवर निर्बंध लादण्यात आल्याचे अमेरिकेने सांगितले आहे. हिंदुस्थान आणि चीन इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतात. हिंदुस्थान, चीनसह आशियातील आठ देशांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. मात्र, सहा महिन्यात त्यांनी इराणकडून तेल खरेदी थांबवावी असे अमेरिकेने म्हटले आहे. हिंदुस्थान आणि चीनने इराणकडून तेलखरेदी थांबवण्याचे आश्वासन दिले आहे काय असा प्रश्न अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावर मौन पाळत त्यांना प्रश्नाला या बगल दिली आहे.

आता निर्बंध लागू झाले आहेत. त्याचे परिणाम बघा. बाजारातील अतिरिक्त तेल कमी झाले आहे. जगातील तेलाचा पुरवठा कमी होणार नाही याकडेही आमचे लक्ष आहे. कोणत्याही देशावर या निर्बंधाचे दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजीही ट्रम्प प्रशासनाने घेतली आहे, असे पॉम्पिओ यांनी सांगितले.