
मोठ्या शहरांमध्ये जागेअभावी घराच्या टेरेसवर लहान गार्डन तयार करतात. मात्र, अनेकदा या झाडांची वाढ खुंटते किंवा पाने पिवळी पडायला लागतात.
रासायनिक खतांचा वापर दीर्घ काळासाठी लाभदायक नाही. अशा वेळी घरी सहजपणे उपलब्ध असलेली कांद्याची साल उपयुक्त ठरेल. एक लिटर पाण्यात मूठभर साल भिजत ठेवावी. हे पाणी गाळून झाडांना द्यावे.
या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह इत्यादी महत्त्वाचे पोषक घटक असतात. आठवडय़ातून एकदा हे पाणी झाडांना द्यावे. यामुळे झाडांची वाढ चांगली होते.


























































