
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हल्ली अनेकांचा इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे ओढा वाढत आहे. रात्रभर गाडी चार्ज केली कि दुसऱ्या दिवशी ती आपल्याला चालविता येते. आवाज न करता व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचविता ही इलेक्ट्रिक गाडी रस्त्यावर धावते. इलेक्ट्रिक गाडी खरेदी करताना ती एका चार्जिंगमध्ये किती किलोमीटर धावते हे तपासले जाते. खालील ट्रिक्स वापरल्यास इलेक्ट्रिक गाडीचा मायलेज 20 ते 30 टक्क्यांनी वाढू शकतो.
गाडीची देखभाल
इलेक्ट्रिक वाहने हि मेंटेनन्स फ्री म्हणून ओळखली जातात. इंजिन ऑइल बदली करणे तसेच एअर फिल्टर बदलणे यांसारख्या गोष्टींची या वाहनांना गरज नसते. त्यामुळे अनेक जण गाडीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतात. मात्र दीड ते दोन महिन्यांनी गाडीची एक्सपर्ट कडून तपासणी केल्यास गाडीमध्ये समस्या जाणवणार नाहीत.
वेग
इलेक्ट्रिक वाहन चालविताना आपले वेगावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. गाडी भरधाव वेगाने चालविल्यास गाडीची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे गाडीचा वेग 40 ते 60 किलोमीटर प्रति तास इतका असावा व गाडी नेहमी इको मोड वर चालवावी.
ओव्हरलोडिंग टाळा
गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन गाडीवर लादल्यास गाडी चालविताना इलेक्ट्रिक मोटरवर दबाव येतो. परिणामी गाडीची रेंज घटते व मोटर आणि बॅटरी मध्ये लवकर बिघाड होऊ शकतो.
चार्जिंग
इलेक्ट्रिक वाहन चालविताना गाडीची बॅटरी पूर्णपणे संपणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. बॅटरी 20 ते 15 टक्क्यांवर असताना गाडी चार्ज करणे गरजेचे आहे. तसेच बॅटरी 100 टक्के चार्ज झाल्यावर चार्जिंग वेळेत बंद करावे.


























































