मोदी-शहा भाजपच्या ‘या’ दलित खासदारांचा पत्ता कापणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आगामी लोकसभे निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१४ मध्ये निवडून आलेल्या खासदारांपैकी १५० खासदारांचा पत्ता यंदा कापण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये दलित खासदारांची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या दलित खासदारांनी आधीच वेगवेगळे पक्ष चाचपण्यास सुरुवात केली आहे.

हिंदी वृत्तपत्र जनसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लोकसभेच्या दृष्टीने देशातील सगळ्यात जास्त खासदार देणाऱ्या उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७१ जागांवर भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यापैकी १७ खासदार हे दलित आहेत. त्यातील काही खासदारांना याची चाहूल आधीच लागल्यानं त्यांनी सरकारवर दलितविरोधी असल्याची टीका सुरू केली आहे. दलितांचं समर्थन करणाऱ्या पक्षांशी त्यांनी चर्चा केल्याची माहिती देखील या वृत्तात दिली आहे. सावित्री बाई फुले, छोटेलाल खरवार, अशोक दोहरे, यशवंत सिंह यांची नावं कापली जाण्याची शक्यता अधिक असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. काही खासदार बसपशी संपर्कात असल्याची माहिती देखील म्हटलं आहे.