डांसिंग अॅब्युलन्स पाहून पोलिसही चक्रावले, दरवाजा उघडल्यावर बसला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाराणसीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भररत्यात एक अॅब्युलन्स अधूनमधून हलत होती. बराच वेळ ती एकाजागेवरच असल्याने नागरिकांना संशय आला. त्यांनी अॅब्युलन्समध्ये पाहिले असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले असता त्यांनी आत पाहिले असता तेही अचंबित झाले. आत भररस्त्यात अॅम्ब्ययुलन्समध्ये तीन तरुण व एक तरुणी अश्लील चाळे करत होते.

शुक्रवारी संध्याकाळी सुजाबाद चौकीसमोर एक अॅम्ब्युलन्स थोड्या थोड्या वेळाने हलताना दिसत होती. त्यावेळी नागरिकांना आत एखादा रुग्ण असल्याचा संशय आला. मात्र बराच वेळ ती अॅम्ब्युलन्स एकाच जागेवर असल्याने नागरिकांना काहीतरी गडबड असल्याचे वाटले आणि त्यांनी तिथे जाऊन त्या अॅम्ब्युलन्समध्ये डोकावले. स्थानिकांना अॅम्ब्युलन्समध्ये 3 तरुणांसोबत 1 युवती आक्षेपार्ह स्थितीत दिसली. त्यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. अॅम्ब्युलन्समध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत सापडलेल्या तरुण तरुणीला पोलिसांनी अटक केली.

या चौघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर अॅम्ब्युलन्सला सील करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही अॅम्ब्युलन्स वारणसी येथील मंडुवाडी परिसरातील खासगी रुग्णालयाची आहे. ती अॅम्ब्युलन्स मालकाने एका व्यक्तीला भाड्याने दिली होती.  त्यातून रुग्णाना ने आण करण्याचे काम करत होते.