‘वैद्यराज’ लघुपट पोहोचला देश-विदेशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सतीश पुळेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘वैद्यराज’ या लघुपटाने देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये लक्षणीय यश संपादन केले आहे. हिंदुस्थानातील जागरण चित्रपट महोत्सव व गोवा लघुपट महोत्सव आणि विदेशातील बुकारेस्ट चित्रपट महोत्सव, लाँग स्टोरी शॉर्टस्-रोमानिया, बेस्ट शॉर्ट फिल्म अवॉर्डस्-लॉस एंजेलिस, सायकेडेलीक चित्रपट महोत्सव-न्यूयॉर्क, फिल्म इन पह्कस- रोमानिया या महोत्सवांमध्ये ‘वैद्यराज’ हा लघुपट समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच सर्वोत्तम अभिनेता म्हणून ज्येष्ठ कलावंत सतीश पुळेकर यांना नामांकनही मिळाले आहे. चिन्मय प्रॉडक्शन निर्मित लघुपटात सतीश पुळेकर, प्रज्ञा पेंडसे, केदार जोशी, स्वरदा करंदीकर, शिल्पा गाडगीळ, दिव्या चौधरी आदी कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. ‘वैद्यराज’ या लघुपटाची निर्मिती डॉ. दिनेश वैद्य यांनी केली असून या लघुपटाचे चित्रण गुळसुंदा-आपटा या निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे.

‘वैद्यराज’ या लघुपटासाठी संवाद, पटकथेची जबाबदारी नंदू परदेशी यांनी सांभाळली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन नीलेश देशपांडे यांनी केले आहे. छायाचित्रण मोहर माटे, तर संकलन प्रवीण जहागीरदार यांचे आहे. संगीत कमलेश भडकमकर, तर कला हेमंत काकिर्डे, निर्मितीप्रमुख संभाजी जायभये, मीनेश गाडगीळ, निखिल गाडगीळ यांचे विशेष सहाय्य चित्रपटासाठी लाभले आहे.