रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार, अक्रमची भविष्यवाणी

मुंबई इंडियन्स पराभवांच्या मालिकेमुळे आयपीएलच्या बाहेर फेकली गेली आहे. तसेच संघाचा तारणहार रोहित शर्माही पुढच्या मोसमात मुंबई इंडियन्स सोडणार, अशी भविष्यवाणी खुद्द पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रमने दिली आहे.

मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने रोहितकडून कर्णधारपद खेचून घेत हार्दिक पंडय़ाकडे सोपवले होते. हा प्रकार क्रिकेट चाहत्यांना पटला नव्हता. त्यामुळे मुंबईला या मोसमात फार चांगली कामगिरीही करता आली नाही. मुंबईचे नेत्त्वृबदल हीच सर्वात मोठी अडचण ठरली आहे. या निर्णयाचा रोहितला प्रचंड राग आला होता. तरीही तो हा मोसम मुंबईसाठी खेळला. मात्र पुढच्या मोसमात तो नसणार. मी त्याला कोलकात्याकडून खेळताना पाहू इच्छितो. तुम्हीच कल्पना करा की जिथे गंभीर मेंटॉर, श्रेयस कर्णधार आणि रोहित सलामीला उतरणार. त्यांच्याकडे खूप मजबूत फलंदाजी असेल. तसेच रोहित ईडनवर तुफानी फलंदाजी करतो. तो एक जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याला कोलकात्याकडून खेळताना मला आवडेल, असे अक्रम म्हणाला.