ब्लॅक आऊट झाल्याने डायलिसिसविना 15 रूग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कराकस

अमेरिकेने लावलेल्या निर्बंधामुळे नैसर्गिक इंधनाने समृध्द असलेल्या व्हेनिझुएला या देशाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील अनेक भागात वीज नसल्याने संपूर्ण शहरे व गाव अंधारात बुडाली आहेत. तर वीज नसल्याने किडनीच्या विकाराने ग्रस्त असलेल्या 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना डायलिसिसची गरज होती. पण वीजच नसल्याने त्यांचे डायलिसिस करता आले नाही. अशी माहिती एका स्वयंसेवी संस्थेने दिली आहे.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , वीज नसल्याने येथील 95 टक्के डायलिसिस सेंटर बंद पडली आहेत. ही परिस्थिती अशीच राहीली तर 100 टक्के डायलिसिस सेंटर बंद पडण्याची शक्यता असल्याचे व ही चिंताजनक बाब असून यामुळे 10 हजाराहून अधिक रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
अमेरिका व जगातील 50 हून अधिक देश विरोधी नेते जुआन गाईजोचे समर्थन करत आहेत. गाईदोने नुकतेचं स्वत:ला राष्ट्रपती म्हणून घोषित केले होते. देशातील जनरेटर वर सायबर हल्ला झाल्याचे व तो लवकरच दुरुस्त केला जाईल असे गाईदो यांनी म्हटले आहे.