रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. मतकरी यांच्या ‘समग्र योगदान’ या पुस्तकासाठी बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, ‘फेसती’ या पुस्तकासाठी नवनाथ गोरे यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीने हिंदुस्थानभरातून २२ भाषांसाठी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यापैकी मराठी भाषेत रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.