लव्ह जिहादच्या शिकार बनवणाऱ्या नवऱ्याला हिंदू बनवा – विश्व हिंदू परिषद

17

सामना ऑनलाईन । कोलकाता.

लव्ह जिहादच्या अनेक मुली शिकार बनत आहेत. त्यावर विश्व हिंदू परिषदने एक उपाय काढला आहे. या लव्ह जिहाद विरुद्ध एक अभियान राबवण्यात येत आहे. अभियानानुसार लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलीच्या नवऱ्याला हिंदू बनवा, लग्नानंतर महिलांनी कुंकू लावा, मंगळसुत्र घाला, हिंदू सण साजरे करा, आपल्या घरात धार्मिक सण साजरे करा, असा सल्ला विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.

पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा आणि अंदमान द्वीप या ठिकाणी होणाऱ्या लव्ह जिहादवर बोलताना विश्व हिंदू परिषदेचे आयोजक सचिव सचींद्रथ सिन्हा म्हणाले की, या बाबत विशेषत: संपूर्ण बंगालमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. देशात लव्ह जिहादचे प्रमाण हे अधिकच वाढत चालले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने लव्ह जिहाद विरोधी अभियान तयार केले आहे. यामध्ये प्रचारपत्रक आणि पुस्तिकेच्या माध्यमातून लव्ह जिहाद विरोधी माहिती लोकांपर्यत पोहचवली जाईल. यासाठी घरोघर जनजागृती करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबातील मुली या लव्ह जिहादच्या शिकार झाल्या आहेत, त्यांनी कुणाच्याही दबावात न येता पोलीस तसेच विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी या संघटनांमार्फत आवाज उठवला पाहिजे. तसेच अशा कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करून त्यांना कायद्याचे ज्ञान दिले जाईल. याशिवाय छापील पुस्तिकेद्वारे लव्ह जिहाद कसा ओळखावा. तो कसा थांबवावा. हिंदू मुलींना लव्ह जिहाद द्वारे त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास काय करावे, याबद्दल माहिती दिली आहे.

या लव्ह जिहाद विरूद्ध अभियानात बजरंग दलाचे ४० हजार सदस्य तर दुर्गा दलाचे ३५ हजार सदस्य सामिल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या