सुसाट कार झाडावर आदळून दोघांचा मृत्यू; विक्रोळी येथील घटना

बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुर्व द्रुतगती महामार्गावरील विक्रोळी येथे एक दुर्घटना घडली. भरधाव कार महामार्गावरील प्रवीण हॉटेलसमोरील झाडावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यात चालक व त्याच्यासोबत बसलेल्या अशा दोघांचा मृत्यू झाला, तर कारचे मोठे नुकसान झाले.

रोहित निकम (29) आणि सिद्धार्थ निकम (23) अशी त्या दोघा तरुणांची नावे होती. विक्रोळीच्या कन्नमवार नगरात राहणारे हे दोघे बुधवारी रात्री कारने जात होते. सिद्धार्थ कार चालवत होता. कन्नमवार नगरला लागून असलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील प्रवीण हॉटेलजवळ येताच भरधाव कारवरील सिद्धार्थचे नियंत्रण सुटले आणि कार फुटपाथवरील झाडावर जाऊन आदळली. कारची ही धडक इतकी भीषण होती की, सिद्धार्थ आणि रोहित जागेवरच निपचित पडले.