विनायक राऊत ३० मार्चला उमेदवारी अर्ज भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात माझी खरी लढत ही काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत आहे, असे शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी सांगताना दिनांक ३० मार्च रोजी आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी ज़ाहीर झाली. त्यानंतर विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जरी चौरंगी लढत असली तरी आमची खरी लढत काँग्रेस आघाडी सोबतच आहे. या लढतीत शिवसेना-भाजप युतीचा विजय निश्चित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिल, असे मत व्यक्त केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपण दिनांक ३० मार्च रोजी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहोत, असेही खासदार विनायक राऊत यांनी जाहिर केले.