
हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटचे Asian Games 2026 मध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. शनिवारी (30 मे 2026) पार पडलेल्या अत्यंत अटीतटीच्या पात्रता फेरीत 31 वर्षीय विनेशला पराभवाचा सामना करावा लागला. 53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयलने विनेशचा 6-4 अशा फरकाने पराभव करत तिला स्पर्धेतून बाहेर केले.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेली ही पात्रता फेरी विनेशसाठी कमालीची नाट्यमय ठरली. उपांत्यपूर्व फेरीत हरियाणामधल्या निशूविरुद्ध खेळताना विनेश एका वेळी 0-5 अशी मागे होती, तिथे प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान प्रशिक्षक आणि हिंदुस्थानी कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद झाले. या सर्व मानसिक दबावातून मार्ग काढत विनेशने उपांत्य फेरी गाठली खरी, मात्र मीनाक्षीविरुद्धच्या सामन्यात तिची झुंज अपयशी ठरली आणि तिचे आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीट हुकले.




























































