विनीत चौधरी मालवणचे नवे पोलीस निरीक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मालवण : पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या विनीत चौधरी यांचे प्रभारी अधिकारी अमोल साळुंखे यांनी स्वागत केले. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून विनीत चौधरी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अमोल साळुंखे यांची निवती पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांना जिल्हा मुख्यालयात हलविण्यात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्याकडे येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार सोपविण्यात आला होता. तीन महिन्यांच्या कार्यकालात साळुंखे यांनी फोटो स्टुडिओ चोरी प्रकरणातील संशयित आरोपींनी गजाआड करण्यात व अन्य गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळविले होते.

पोलीस निरीक्षक पद रिक्त असल्याने पोलीस अधीक्षक यांनी नूतन पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची येथे नियुक्ती केली आहे. काल रात्री उशिरा त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी प्रभारी अधिकारी अमोल साळुंखे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. चौधरी हे यापूर्वी रत्नागिरी शहर येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.