‘माझी 76 वर्षांची प्रेयसी प्रेग्नंट आहे’, 19 वर्षीय प्रियकराच्या दाव्याने खळबळ; पण सत्य ऐकून तुम्हीही ‘शॉक’ व्हाल

प्रसिद्धीचा हव्यासापोटी लोकं काय-काय उपद्व्याप करतील सांगता येत नाही. आता हेच पहा ना एका 19 वर्षाच्या तरुणाने त्याची 76 वर्षीय प्रेयसी प्रेग्नंट असल्याचा दावा केला आहे. लवकरच ती बाळाला जन्म देणार असल्याचेही त्याने सांगितले. तसेच तिच्यासोबतचे फोटोही त्याने शेअर केले. मात्र नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर त्याने सत्य सांगितले आणि लोकांना धक्का बसला. यामुळे त्याच्यावर ट्रोलधाड पडली आहे.

इटलीमध्ये राहणारा 19 वर्षीय जोसेफ (Giuseppe D’Anna) हा सोशल मीडियावर सक्रिय असून त्याचे इन्स्टाग्रामवर 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला होता. यात त्याने माझी 76 वर्षीय प्रेयसी गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचा दावा केला होता. आपल्या प्रेयसीचे नाव मिनिना गट्टा असल्याचेही त्याने सांगितले होते.

जोसेफने हा व्हिडीओ शेअर केल्यनंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. एका युजरने ‘ती या वयात गर्भवती होणे’ शक्य नसल्याचे म्हटले, तर एकाने ‘ही महिला तुझ्या आजीच्या वयाची आहे, काहीतरी लाज बाळग’ असा टोला त्याला लगावला. नेटकऱ्यांचा संताप वाढत असल्याचे पाहून अखेर जोसेफने दोघांबद्दलच्या नात्याबाबत खुलासा केला.

सर्व शक्य आहे! 19व्या वर्षी तरुणीने दिला जुळ्यांना जन्म, दोन्ही बाळांचे वडील मात्र वेगवेगळे

‘आमचे नाते खोटे असून मिलिना ही माझी आजी आहे. सुरुवातीला विनोद म्हणून मी तिच्यासोबतचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आम्ही असेच पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला’, असे जोसेफने सांगितले. ‘डेली स्टार’ने याबाबत वृत्त दिले आहे.

ऐकावं ते नवलच; शहरात राहते फक्त एक महिला

दरम्यान, 2022 मध्ये जोसेफ आणि मिलिना व्हायरल झाले होते. दोघांनी आपल्या नात्याबाबात खुलासा केला होता. त्यावेळीही ही जोडी ट्रोलच्या निशाण्यावर आली होती. त्यानंतर लोकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले. अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. ट्रोलला न जुमानता या जोडप्याने आता प्रेग्नेंसीशी संबंधित बातम्या शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली.