देव तारी त्याला कोण मारी! ट्रेन अंगावरुन गेली तरी साध खरचटलं ही नाही…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचीती उत्तर प्रदेशात अनूभवायला मिळाली. एक महिला आपल्या दोन मुलांसहीत ट्रेनमध्ये चढताना पटरीवर पडली. ट्रेन अंगावरुन गेली पण तिघांनाही साधे खरचटले नाही. घार आपल्या पिल्लांचे जसे संरक्षण करते तसेच या मातेने आपल्या मुलांचे संरक्षण केले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रेदशातील चित्रकुट जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बरह रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. बेगुसराया येथील रहीवाशी रवी हा त्याची पत्नी आणि दोन मुलांना घेऊन दिल्लीला जाण्यासाठी बरह रेल्वे स्टेशनवर आला होता. बरह स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर हे कुटुंब विक्रमशीला ट्रेनची वाट बघत थांबले होते. ट्रेन आल्यावर बोगी क्रमांक 8 मध्ये रवी आपल्या कुटुंबासमवेत चढत असताना अचानक गर्दी झाल्याने धक्काबुक्कीत पत्नी आणि दोन मुले ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली. लोकांनी आरडाओरडा केला पण तेवढ्यात ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन सुटली. महिलने धाडस दाखवत मुलांना कवेत घेतले आणि ट्रेन जाईपर्यंत खाली वाकून राहीली. ट्रेन गेल्यानंतर त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

विशेष म्हणजे तिघही सुखरुप असून त्यांना साधे खरचटले सुध्दा नाही. त्यामुळे लोकांना सुध्दा आश्चर्याचा धक्का बसला आणि महिलेच्या धाडसाचे कौतूक केले. महिला आणि तिच्या दोन्ही मुलांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे.