
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी ) टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाच्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनाही स्थान मिळाले आहे. टी-20 विश्वचषक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यामध्ये रविवारी पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावणाऱया इंग्लंड संघातील 4 क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात केली. इंग्लंडने दुसऱयांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंड संघ क्रिकेट इतिहासातील पहिला डबल विश्वविजेता ठरला आहे. वन-डे विश्वचषक स्पर्धेचे जेतेपदही सध्या इंग्लंडकडे आहे. प्रथमच एका संघाने एकाच वेळी वन-डे आणि टी-20 या दोन्हीचे विश्वविजेतेपद पटकावले आहे.

























































