विशाल ठाकूर सायबर विभागाचे नवे उपायुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cyber-police

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई पोलीस विभागातील तीन उपायुक्तांची आज नव्याने नियुक्ती करण्यात आली. नाशिक पोलीस अकादमीतून आलेले विशाल ठाकूर यांच्याकडे गुन्हे शाखेच्या सायबर विभागाची जबाबादारी सोपविण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्याकडे डिटेक्शन-1 सह सायबर पोलीस ठाण्याचा पदभार होता. पठाण यांच्याकडील सायबर विभागाचा पदभार विशाल ठाकूर यांच्याकडे देण्यात आला आहे, तर रायगडहून आलेले उपायुक्त दत्ता नलावडे यांच्याकडे गुन्हे शाखेच्या प्रतिबंधक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांच्याकडे कोळे कल्याण विभागाचा चार्ज देण्यात आला आहे.