विस्ताराच्या विमानात बॉम्बची धमकी
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून मुंबईत येणाऱ्या विस्तारा पंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली. या धमकीमुळे विमानातील क्रू-मेंबर्स आणि 306 प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. यानंतर तत्काळ विमानाची मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विमानाची तपासणी करण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
लग्नाचे वचन पूर्ण न होणे म्हणजे फसवणूक नव्हे! प्रियकर दोषमुक्त, सात वर्षांची शिक्षा रद्द
लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवणार्या प्रियकराला पंजाब – हरियाणा हायकोर्टाने दोषमुक्त ठरवून त्याची सात वर्षांची शिक्षा रद्द केली. वचन पूर्ण केले नाही, याचा अर्थ फसवणूक झाली, असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले.
सत्र न्यायालयाने याचिकाकर्त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याने हायकोर्टात धाव घेतली. लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. मात्र ‘महिला सज्ञान होती. ती स्वतःच्या मर्जीने आरोपीसोबत पळाली होती. त्याच्यासोबत तीन दिवस राहिली. त्याच्या मोटारसायकलवरून फिरली. तेव्हा तिने कोणताही विरोध केला नाही. या सर्व परिस्थितीवरून असं दिसंतय की महिलेची संमती होती. त्यामुळे याचिकाकर्त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकीलांनी केला.
अनेक रहस्ये उलगडणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चीनचे यान उतरले
चीनने अंतराळ क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी कामगिरी केली आहे. चीनचे चँग ए-6 हे यान चंद्राच्या सर्वात जास्त अंधार असणाऱ्या भागात यशस्वीरीत्या उतरले आहे. चीनमधील राष्ट्रीय अंतराळ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील प्रमाण वेळेनुसार रविवारी सकाळी 6.23 वाजता चँग ए-6 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एटकेन बेसिनमध्ये उतरले. हे यान 23 दिवसांनी चंद्रावरील खडकाचे नमुने घेऊन पुन्हा पृथ्वीवर येणार असल्याची माहिती आहे. 3 मे रोजी चीनने चँग ए-6 या यानाचे उड्डाण केले होते.
चंद्रावरून दोन किलोचे सॅम्पल आणणार
– चँग ए-6 या यानातील प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या सर्वात जुन्या खडकातून काही नमुने गोळा करणार आहेत. ही चीनची सर्वात कठीण अवकाश मोहीम आहे. यानाचे लँडिंग करण्याचे चीनसमोर एक मोठे आव्हान होते. यापूर्वी 2019 मध्ये चँग ई-4 ने यशस्वी लँडिग केले होते. यावेळी यानाचे लँडर जवळपास तीन दिवस चंद्राच्या या भागात राहून त्या ठिकाणच्या वेगवेगळय़ा घटकांचे नमुने गोळा करणार आहे.
अमेरिकेत बर्थ डे पार्टीत फायरिंग; एकाचा मृत्यू
अमेरिकेतील ओहायोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. एका बर्थ डे पार्टीत झालेल्या या गोळीबारात 27 जण जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही पॅमेऱयात पैद झाली आहे. घटनास्थळावरून एक बंदूकही जप्त करण्यात आली, मात्र कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. गोळीबार का झाला याचे उत्तर अद्याप पोलिसांना मिळालेले नाही. याप्रकरणी कुणालाही काही माहीत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पोलिसांनी एक पह्न नंबरही जारी केला आहे.
बाबाचे नाव काढण्यासाठी ब्रॅड पिटची लेक कोर्टात
प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट हे हॉलीवूड विश्वातील सातत्याने चर्चेत असलेले जोडपे. या जोडप्याने 10 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांची मोठी मुलगी शिलोह हिच्यामुळे जोली आणि पिट पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण शिलोहने आपल्या नावातून बाबा ब्रॅड पिटचे नाव हटवण्यासाठी लॉस एंजेलिसच्या न्यायालयात कायदेशीर अर्ज केला आहे. 27 मे रोजी शिलोह 18 वर्षांची झाली. शिलोह नॉवेल जोली-पिटने लॉस एंजेलिसमधील काउंटी सुपीरियर कोर्टात तिचे नाव बदलून फक्त शिलोह नॉवेल ठेवण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
‘‘मिस्टर बिस्ट’चा यू-टय़ुब रेकॉर्ड कोण मोडेल?
‘मिस्टर बिस्ट’ हे जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेले यू-टय़ुब चॅनेल बनले आहे. टी-सिरीजला मागे टाकत ‘मिस्टर बिस्ट’ने रेकॉर्ड केला. ‘मिस्टर बिस्ट’चे 27.7 कोटी सबस्क्रायबर्स आहेत. तर टी-सिरीजचे 26.6 कोटी सबस्क्रायबर्स आहेत. याचा अर्थ ‘मिस्टर बिस्ट’ एक लाख सबस्क्रायबर्सच्या संख्येने पुढे गेला आहे. जिम्मी डोनाल्डसन हा 26 वर्षांचा तरुण ‘मिस्टर बिस्ट’ नावाने यू-टय़ुब चॅनेल चालवतो. स्वतःला जिवंत पुरणे किंवा 100 दिवस सोबत राहण्याचे आव्हान ‘मिस्टर बिस्ट’ देतो. 2019पासून सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेले यू-टय़ुब चॅनेल म्हणून टी-सिरीजचे राज्य होते.
फटाक्यांच्या स्फोटामुळे 11 मृत्यमूखी
ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या चंदन यात्रा उत्सवादरम्यान फटाक्यांचा स्पह्ट होऊन 30 जण भाजले होते. 9 जणांचा गंभीर भाजल्यामुळे मृत्यू झाला होता. आज आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या 11 वर पोहोचली आहे. सध्या 19 जणांवर पुरी, भुवनेश्वर आणि कटक येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 29 मे रोजी रात्री भगवान जगन्नाथांच्या चंदन यात्रा उत्सवादरम्यान फटाक्यांच्या ढिगाऱयाचा स्फोट झाला होता. यात 30 जण जखमी झाले होते. घटनेप्रसंगी शेकडो भाविक नरेंद्र पुष्करिणी नदीच्या किनारी जगन्नाथांचा चंदन यात्रा उत्सव पाहण्यासाठी उपस्थित होते.