
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुसळधार पावसामुळे मुंबई व कोकणातील रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वत्र खड्डे पडले आहेत. वाहतूककोंडी होते. प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारने टोल माफ करावा, अशी मागणी शिवेसना आमदार प्रकाश सुर्वे यांनी विधानसभेत केली. अतिवृष्टीमुळे रस्त्यात खड्डे पडल्यामुळे आधीच वाहतूककोंडी होते. त्यातच टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागतात. टोल माफ केला तर लोकांना दिलासा मिळेल. दहिसर पूर्वेला शिवटेकडी, अशोकवन जमीन खचली. त्यात तीन घरे पडली. त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत अशी मागणीही सुर्वे यांनी केली.
























































