
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने मंगळवारी जलशक्ती मंत्रालयाच्या माजी सीएमडीच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. यावेळी पाणी आणि ऊर्जा सल्लागार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांच्या घरावर छापे टाकून सीबीआयने रोख 20 कोटी रुपये जप्त केले आहेत.
यावेळी दिल्ली आणि चंदीगडसह देशभरातील त्यांच्या मालमत्तांवर मंगळवारी, 2 मे रोजी छापेमारी करण्यात आली. या छाप्यात एकूण 20 कोटी रुपये रोकड आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आरोपी राजेंद्र कुमार गुप्ता हे वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सीमध्ये ‘सीएमडी’ म्हणून काम करत होते. हा विभाग जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रकुमार गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेसाठी गुन्हा नोंदवला. त्यानंतर सीबीआयने दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबादसह सुमारे 19 ठिकाणी छापे टाकले. यावेळी 20 कोटी रुपयांची रोख रक्कम, मालमत्तेंशी संबंधित कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. या छाप्यावेळी अधिकाऱ्यांना सुटकेस आणि बेडमध्ये रोख रक्कम मिळाली.
WAPCOS हे ‘वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड’ म्हणून ओळखले जाते. ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची आहे. WAPCOS हे जलशक्ती मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालणारा उपक्रम आहे. हा प्रकल्प केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. या उपक्रमाला या पूर्वी ‘वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) म्हणून ओळखले जाते.



























































