संचारबंदी….युद्ध आमुचे सुरू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे कोरोनाबरोबर आजपासून युद्ध सुरू झाले. राज्यात संचारबंदी लागू झाली. आता फक्त अत्यावश्यक कामांसाठीच नागरिकांना घराबाहेर पडता येईल. रोज हजारोंना संसर्ग करणाऱया कोरोनाची साखळी आता तोडावीच लागणार आहे. त्यासाठी राज्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. एरव्ही गजबजणारे रस्ते सुनसान दिसत आहेत. फक्त पोलिसांच्या गाडय़ा, अॅम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक वाहनेच दिसत आहेत. दुकाने, आस्थापने बंद आहेत. लोकल, बसेसमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतीलच प्रवासी आहेत. भविष्यातील संभाव्य गंभीर धोका टाळण्यासाठी आजपासून छेडलेले हे युद्ध प्रत्येकाला जिंकावेच लागणार आहे आणि जनतेचा निर्धार पाहून ते निश्चितच जिंकले जाईल याची खात्री सरकारने व्यक्त केली आहे.

हे सुरू राहणार

  • किराणा, भाजीपाला, फळ विव्रेते, दूध पुरवठा, बेकरीसह अन्नधान्याची दुकाने
  • विमान, ट्रेन, टॅक्सी, रिक्षा, बससेवा
  • पेट्रोल पंप तसेच पेट्रोलियम उत्पादने
  • सरकारी आणि खासगी सुरक्षा व्यवस्था, एटीएम, पोस्ट आणि बँका

यावर निर्बंध

  • रेस्टॉरंट आणि बार बंद राहणार,केवळ पार्सल सेवेसाठी परवानगी
  • सिनेमा हॉल, नाटय़गृहे, अॅम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क, क्लब, स्विमिंग पूल, जीम आणि क्रीडा संकुले
  • केशकर्तनालये, स्पा, सलून ब्युटी पार्लर.