
बिहारमध्ये एका माजी आमदाराच्या गाडीत चक्क पेट्रोल ऐवजी पाणी भरण्यात आले आहे. या प्रकरणी माकप नेते बिरेंद्रे गुप्ता यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचीही मागणी केली आहे.,
बिरेंद्र गुप्ता हे मार्क्सवादी पक्षाचे नेते आहेत. पश्चिम चंपारण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्वही केले होते. सोमवारी गुप्ता सिक्ताहून पाटण्याला जात होते. तेव्हा चंपारण जिल्ह्यातील मेहसी भागात त्यांनी पेट्रोल भरले. पेट्रोल भरल्यानंतर अवघ्या 500 मीटरवर त्यांची गाडी बंद पडली. मेकॅनिकने गाडी तपासून पाहिली असताना गाडीत पेट्रोल ऐवजी पाणी भरल्याचे त्याने सांगितले.
बिरेंद्र गुप्ता यांनी तत्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी पेट्रोल पंप मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच गाडीत भरलेल्या पाण्याचे नमूने तपासण्याठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. हा प्रश्न गंभीर असून सामान्य जनतेशी निगडीत आहे, म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.




























































