‘गोमांस खाणाऱ्यांसाठी दरवाजे बंद करता येणार नाहीत’, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांचं विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dattatreya-hosabale

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, ‘असे काही लोक आहेत ज्यांनी जबरदस्तीने गोमांस खाल्ले असेल. पण आम्ही त्यांच्यासाठी दार बंद करू शकत नाही. अशा लोकांना आपण पुन्हा आपल्या धर्मात आणू शकतो’.

दत्तात्रेय होसाबळे म्हणाले की, ‘ज्यांचे पूर्वज हिंदू आहेत, ते हिंदू आहेत. ते आज कोणती पूजा करत आहेत, आता काय करत आहेत, हा आपला विचार नाही. जो स्वतःला हिंदू समजतो तो हिंदू आहे. एक तिसराही आहे, ज्यांना आपण हिंदू म्हणतो, ते हिंदू नाहीत.’

दत्तात्रय होसाबळे बुधवारी जयपूरमध्ये आयोजित दीनदयाळ स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, देशात किती जमाती आहेत.. 600 हून अधिक…. आम्ही वेगळे आहोत असे या जमातींचे म्हणणे आहे. आम्ही हिंदू नाही. त्यांना चिथावणी देण्याचे काम हिंदुस्थानविरोधी शक्तींनी केले आहे.’

ते म्हणाले की, ‘गोळवलकर गुरुजींनी ते हिंदू असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत जर आपण वसुधैव कुटुंबकमच्या दिशेने काम करत असाल तर आपण त्यांच्यासाठी दरवाजे बंद करू शकत नाही’. होसाबळे यांनी स्पष्ट केलं की, ज्यांनी बळजबरीने गोमांस खाल्ले आहे, त्यांना आम्ही सोडू शकत नाही. आम्ही त्यांच्यासाठी दरवाजे बंद करू शकत नाही. आम्ही त्यांची घरीवापसी करू शकतो’.

‘भारत हे हिंदू राष्ट्र आहे कारण या राष्ट्राची उभारणी करणारे हिंदू होते. सत्य आणि कामाच्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत’, असे ते म्हणाले.

पुढे त्यांनी डॉ. हेडगेवार यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, डॉ. हेडगेवार कोण हिंदू आहे की नाही, या वादात कधी पडले नाहीत. जे हिंदुस्थानला आपली पितृभूमी मानतात ते हिंदू आहेत, ज्यांचे पूर्वज हिंदू आहेत, ते लोक हिंदू आहेत. जो स्वतःला हिंदू समजतो तो हिंदू आहे.’