महिला दिनी ममतांचा मोर्चा, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता रॅलीनंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकात्यात भव्य मोर्चा काढला आहे. या मोर्च्यात टीएमसीने यूपीमध्ये महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मोर्च्या दरम्यान ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘आधी तुम्ही दिल्ली सांभाळा आणि मग बंगालबद्दल बोला.’ ममता बॅनर्जी यांनी महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन आपल्या भाषणाची सुरूवात केली. त्या म्हणाल्या, ‘ही मातृभूमि हजारा मदर तेरेसांची भूमी आहे. हा दिवस आम्ही महिला मुक्ति दिन म्हणून साजरा करतो. महिला अत्याचार सहन करू शकत नाहीत. महिलाच सर्वकाही आहेत. त्याच देवी, त्याच देवता आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करत त्या म्हणल्या की, ‘ते म्हणतात बंगालमधील मुली सुरक्षित नाहीत. गुजरातमध्ये दररोज 1944 हत्या होते. गुजरात आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्ये बलात्काराच्या प्रकरणात पुढे आहेत. ही अधिकृत आकडेवारी आहे.’ वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर केंद्रावर टीका करत ममता म्हणल्या, ‘घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपये झाली असून ही किंमत सातत्याने वाढत आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या