असं झालं तर… पीएफचे पैसे एटीएम आणि यूपीआयद्वारे काढायचे असतील तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘EPFO 3.0’ प्रणाली अंतर्गत पीएफधारकांना थेट एटीएम आणि युपीआयद्वारे 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा देणार आहे.

EPFO Member Portal  वर UAN नंबर, पासवर्ड टाकून लॉगिन करा. त्यात ‘Online Services’ मेन्यूमध्ये ‘Claim (Form-31, 19, 10C & 10D)’ पर्याय निवडा.

‘Proceed For Online Claim’ वर क्लिक करून ‘I want to apply for’ या रकान्यात PF Advance किंवा Only PF Withdrawal निवडा.

तुम्हाला हवी असलेली रक्कम टाका आणि तुमचा घरचा पत्ता भरा. त्यानंतर तुमच्या बँकेच्या पासबुकचे पहिले पान किंवा
‘पॅन्सल चेक’चा स्पष्ट पह्टो अपलोड करा.

सर्व माहिती भरून ओटीपी प्रविष्ट करा आणि ‘Submit’ वर क्लिक करा. PF अॅडव्हान्सचे क्लेम 3 ते 7  कामकाजाच्या दिवसांत मंजूर होऊन थेट कर्मचाऱयाच्या बँकेत जमा होतात.