
1 तुम्ही रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करूनही तुम्हाला रेशन कार्ड मिळाले नसेल, तर तुम्ही अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या टोल-फ्री नंबरवर त्याबाबत विचारणा करू शकता.
2 1967 किंवा 1800-22-4950 या हेल्पलाइन नंबरवर किंवा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन तक्रार करू शकता.
3 तक्रारीनंतर मिळालेल्या ट्रकिंग आयडीमुळे पाठपुरावा करणे सोपे होईल. ऑनलाइन तक्रारीची दखल न घेतल्यास तुम्ही क्षेत्रीय शिधावाटप विभागात जाऊन चौकशी करू शकता.
4 शिधावाटप अधिकारी किंवा विभागीय कार्यालयात जाताना तुमच्या ऑनलाइन अर्जाची पावती व कागदपत्रे तुमच्या सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे.
5 ग्रामीण भागातील अर्जदारांनी तहसील कार्यालयात जाऊन निरीक्षक किंवा तहसीलदार यांची भेट घ्यावी. रेशन कार्डाचा पाठपुरावा करण्यासाठी अर्जाची पावती सोबत ठेवणे.
































































