सामना ऑनलाईन । मुंबई
व्हॉटस्अॅप या प्रभावी माध्यमाचा जगभरात मोठ्या प्रमाणात वापर होतो, मात्र काही लोक थर्ड पार्टी अॅप वापरत असल्याचे उघड झाले आहे. म्हणून कंपनीने आपल्या युजर्सना ब्लॉगच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा दिला आहे.
ब्लॉगमध्ये व्हॉटस्अॅपने थर्ड पार्टी अॅपकरून युजर कशाप्रकारे खऱ्या अॅपकर येऊ शकतात ते सांगितले आहे. तसेच कोणत्या प्रकारची थर्ड पार्टी अॅप तुमचे खाते बंद करू शकतात तेसुद्धा सांगितले आहे. जीबी व्हॉटस्अॅप हे व्हॉटस्अॅपशी मिळतेजुळते थर्ड पार्टी अॅप आहे. याचा वापर केल्यास व्हॉटस्अॅप तुमचे अकाऊंट बंद करू शकते असा इशारा व्हॉटस्अॅपने दिला आहे. तसेच बीएई व्हॉटस्अॅप हे अॅप वापरणाऱ्यांचे व्हॉटस्अॅपही बंद होऊ शकते.


























































