लैंगिक संबंधांसाठी नवऱ्याची जबरदस्ती, बायकोने संतापाने जीभ कापली

शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती करणाऱ्या नवऱ्याची जीभ बायकोने कापल्याची घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे घडली आहे. या घटनेनंतर जखमी नवऱ्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे.

लखनौच्या ठाकूरगंज येथे ही घटना घडली आहे. रमेश (नाव बदललेले) आणि नेहा (नाव बदललेले) हे जोडपं इथे राहतं. नेहाच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. ती त्या दुःखात होती. त्याच दरम्यान रमेश तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव आणत होता.

घटनेच्या दिवशी रमेश नेहावर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करू लागला. नेहाने त्याला आधी शांतपणे नकार दिला. तरीही रमेश तिच्यावर जबरदस्ती करू लागला. त्यामुळे संतापलेल्या नेहाने त्याची जीभ कापली.

रक्तबंबाळ झालेल्या रमेशला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. नेहाविरुद्ध 326 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.