बायको खर्रा खाते म्हणून पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बायको सतत खर्रा खाते म्हणून नवर्‍यात थेट कोर्टाची पायरी चढली आहे. नवर्‍याने घटस्फोटासाठे अर्ज केला आहे परंतु कोर्टाने नवर्‍याला दिलासा दिला नसून याचिका फेटाळली आहे.

नागपूरमध्ये शंकर आणि रिना यांचे 2003 साली लग्न झाले होते. पण लग्नानंतर दोघांमध्ये आलबेल नव्हते. रिना सतत माहेरी जाते, घरातील कामं करत नाही. तसेच रिनाला खर्रा खाण्याचे व्यसन आहे. त्यामुळे रिनावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हा खर्च आपल्याला परवडणारा नसल्याचे शंकरने म्हटले आहे.

कोर्टाने इतर कारणं सामान्य असल्याचे म्हटले आहे. तसेच खर्रा खाणे ही वाईट आणि गंभीर गोष्ट आहे पण ते घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे.

यापूर्वी पती शंकरने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा शंकर आणि रिनाचे लग्न टिकून रहावे यात दोन्ही मुलांचे हित आहे मत कौटुंबिक न्यायालयाने व्यक्त केले  होते. तेव्हा पती शंकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शंकरची याचिका फेटाळून लावली आहे.