‘या’ कारणामुळं नवऱ्यानं बायकोचं केलं टक्कल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शाहजहांपुर

बायकोनं दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्सला नकार दिल्यामुळे संतापलेल्या नवऱ्यांनं तिचं टक्कल केल्याची घटना समोर आली आहे. ही विचित्र घटना उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर येथे घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

अशोक कुमार( वय ३२) असं आरोपीचं नाव आहे. त्याचं नऊ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तसंच या विवाहित दाम्पत्याला दोन मुलंही आहेत. बायको रविवारी रात्री बहिणीच्या घरून परतली तेव्हा अशोक एका व्यक्तीकडून पैसे घेऊन काहीतरी बोलत असल्याचं तिनं पाहिलं. यानंतर अशोक तिच्या खोलीत आला आणि तिला अज्ञात व्यक्तीसोबत सेक्स करण्यास धमकावू लागला. परंतु तिनं स्पष्ट शब्दात या गोष्टीला नकार दिला. तिच्या नकारामुळे तो रागावला आणि तिचा बदला घेण्याचं त्यानं ठरवलं. त्यानं आपल्या भावासोबत कट रचला आणि तिच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळवून तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर अशोकनं तिचं टक्कल केलं.

सोमवारी सकाळी आपली ही स्थिती पाहून तिला धक्काच बसला. यावर तिनं आपल्या मुलांना विचारलं असता त्यांनी अशोक व त्याच्या भावानं हे कृत्य केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. संतापलेल्या तिनं ताबोडतोब पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.