
सामना ऑनलाईन । मुंबई
सध्या स्मार्टफोनचं जग असल्याने आपलं सगळं आयुष्य या फोनच्या छोट्याशा चौकटीशी जोडलेलं असतं. जगाशी संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण आज स्मार्टफोनवर अवलंबून असतो किंबहुना चिकटलेले असतो. असा हा बहुपयोगी स्मार्टफोन सतत चार्ज राहावा म्हणूनही आपला जीव वरखाली होतो आणि सतत आपण त्याला चार्जिंगला लावत असतो. पण अशा सततच्या चार्जिंगमुळे किंवा रात्रभर चार्ज केल्यामुळे फोनवर वाईट परिणाम होतात. त्यामुळे अशा स्मार्टफोन प्रेमींसाठी या काही महत्त्वाच्या टीप्स-
१. फोन वारंवार चार्जिंगला लावू नये. वारंवार चार्जिंगला लावल्यामुळे फोनच्या बॅटरीची क्षमता कमी होते आणि ती खराब होते.
२. रात्रभर फोन चार्जिंगला लावून तो खराब होत नाही. मात्र, रात्री फोन चार्जिंगला लावण्यापूर्वी त्याचे कव्हर अवश्य काढले पाहिजे. कारण, चार्जिंगवेळी फोनमध्ये तयार होणारी उष्णता कव्हरमुळे बाहेर पडू शकत नाही. या उष्णतेचा बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.
३. फोन अतिप्रमाणात चार्जिंगला लावू नका. तुमच्या कामापुरता फोन जर चार्ज असेल तर त्याला वारंवार चार्ज केल्याने मोबाईलचं आयुष्य कमी होतं.
४. आपण बऱ्याचदा दुसऱ्या कुठल्याही चार्जरने फोन चार्ज करतो. पण, असं करणं चुकीचं आहे. मोबाईलसोबत येणारा चार्जरच वापरावा. जर तो हरवला असेल तर नवीन चार्जर घ्यावा. पण, दुसरा चार्जर वापरल्याने मोबाईलच्या बॅटरीचं नुकसान होऊ शकतं.





























































