विल स्मिथ पोचला बुर्ज खलिफाच्या टॉपवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ अॅक्शन आणि स्टंटसाठी प्रसिद्ध आहे. आता विल स्थिमचा पडद्याबाहेरील ताजा कारनामा बघून चाहते हैराण झाले आहेत. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईतील गगनचुंबी बुर्ज खलिफाच्या टोकावर जाऊन स्मिथने काही फोटो काढले आहेत. एका युटय़ूब सीरिजसाठी स्मिथने हे  फोटोसेशन केले आहे.

बुर्ज खलिफाच्या टॉपवर पोचताना विल स्मिथचा व्हिडीओ आणि  फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 160 मजल्यांची ही इमारत दोन हजार सातशे 22 फूट उंच आहे. युटय़ूब शो ‘बेस्ट शेप ऑफ माय लाईफ’च्या एका एपिसोडसाठी बुर्ज खलिफाच्या टॉपवर स्मिथ पोचला. त्याच्या तयारीचा व्हिडियो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तसंच ड्रोनच्या मदतीने त्याचे काही फोटो काढण्यात आले आहेत. स्मिथचे धाडस पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.