Lok Sabha 2019 मोठ्या मताधिक्क्याने जिंकू, नितीन गडकरींचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला यंदा मी मोठ्या मताधिक्क्याने जिंकू असा निर्धार केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.

गडकरी म्हणाले की, “पक्षाने आपल्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे, यावेळी मोठ्या मताधिक्क्याने निवडून येऊ. नागपुरच्या जनतेने मागच्यावेळी चांगला पाठिंबा द्ला. आम्ही केलेल्या कामाबद्दल ते समाधानी आहेत.” तसेच निवडून आल्यानंतर अजून चांगले काम करू असेही गडकरी यावेळी म्हणाले.