देशात मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी लोखंडे यांना निवडून द्या – दादा भुसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आणि खासदार यांनी केलेल्या विकास कामाचा विचार करता लोखंडे यांचा विजय निश्चित आहे. हे जरी खरे असले तरी या देशाला नरेंद्र मोदी सारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे. तेंव्हा शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी कोपरगावात शिवसेना- भाजपा, रिपाई (आ) , शिव-संग्राम, रासप महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना केले.

राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या महाआघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला संपर्क मंत्री आमदार नरेंद्र दराडे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार स्नेहलता कोल्हे , साई संस्थान विश्वस्त बिपीन कोल्हे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, भाजप राज्य पदाधिकारी रवींद्र बोरावके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सपना मोरे , तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, नितीन औताडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद नाना थोरात, कोपरगाव शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ, भाजपा शहराध्यक्ष कैलास खैरे, सुहास वहाडणे, डॉ. क्षिरसागर, कोल्हे कारखाना उपाध्यक्ष संजय होन, उपनगराध्यक्ष विजय वाजे, शिवसेना भाजप नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी कोल्हे कारखाना संचालक आदींची उपस्थिती होती. आमदार नरेंद्र दराडे म्हणाले, सेना-भाजपा युती ही खासदारकी पुरती नाही तर ती यापुढे तळागाळातील प्रत्येक निवडणुकीसाठी राहणार आहे. तेंव्हा माझ्या वतीने या कोपरगाव मतदारसंघात आमदार स्नेहलता कोल्हे या काम पाहतील असे त्यांनी सांगितले.

खासदार लोखंडे यांनीही गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रमुख कामांची माहीती देत २०१४ मध्ये दानाच्या रूपाने मतदान केलंत आता काम पाहून मतदान करा, असे आवाहनही केले.

आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, गल्लीतील भांडणे विसरून माणूस दिल्लीला पाठवायचा आहे देशभक्ती आणि देशप्रेमासाठी कार्यकर्ता म्हणून मतदारापर्यंत पोहचा, आता वाद नाही लोकसभेप्रमाणे विधानसभेला सोबत राहू असे त्यांनी सांगितले. बिपीन कोल्हे म्हणाले, सदाशिव लोखंडे दिसले नाही, यापेक्षा खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी निधी किती आणला, योजना किती आणल्या, लोकसभेत प्रश्न किती मांडले, याचा विचार मतदारांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोखंडे हा जमिनीवरचा माणूस आहे. तर सचिन तांबे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवारही मिळत नसल्याचे सांगत केंद्र व राज्य सरकारांबरोबरच खासदारांच्या माध्यमातून झालेली कामे लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. यावेळी सुहास वहाडणे, नितीन औताडे, शिवाजी ठाकरे, अँड. रवींद्र बोरावके योगेश बागुल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन विजय जाधव यांनी प्रास्ताविक शरद नाना थोरात तर शेवटी आभार कैलास जाधव यांनी मानले.