
कोरोनाच्या संकटामुळे दोन दिवस घेतलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपूर येथे होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. कोरोना संसर्गामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै असे दोन दिवस पार पडले. या दोन दिवसांत विधानसभेचे 10 तास 10 मिनिटे कामकाज झाले. कामकाजाचा 1 तास 25 मिनिटांचा वेळ वाया गेला. सभागृहात 12 विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी 9 विधेयके संमत झाली. याशिवाय चार शासकीय ठराव मंजूर झाल्याची माहिती उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली.




























































